कल्याण : बोक्सिडो स्पोर्ट फौंडेशन इंडिया या अधिकृत संघटनेच्या वतीने बॉक्सिंडो राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपति क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे २२ मे रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत बारा राज्यातील चारशे साठ मुला मुलींनी सहभाग घेतला होता. बॉक्सिंडो राष्ट्रीय स्पर्धेत मोहोने एनआरसी च्या ४१ मुलांनी ८२ मेडलसाठी खेळून २९ गोल्ड, २० सिल्वर, ३३ ब्रॉंझ मेडल्स जिंकून बाजी मारत एनआरसी – मोहोने संघ दुसऱ्या क्रमांकाने विजयी झाला.
तर महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या जिल्यातील अडीचशे स्पर्धक सहभागी झाले होते. ठाणे जिल्ह्यातील कल्याण जवळील मोहोने येथील ४१ स्पर्धक कांता व कुमिते या कराटे मधील दोन्ही प्रकारांत लहान मोठ्या गटातून सहभागी झाले होते. बॉक्सिंडो राष्ट्रीय स्पर्धेत मोहोने एनआरसीच्या ४१ मुलांनी ८२ मेडल साठी खेळून २९ गोल्ड, २० सिल्वर, ३३ ब्रॉंझ मेडल्स जिंकून ठाणे जिल्ह्याचे आणि कल्याण तालुक्यातील एनआरसी मोहोन्याचे नाव गाजविले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र ‘राज्यचे विजय संतान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक – राजेंद्र निकाळजे (शस्त्र विरोधी पधक -पिंपरी चिंचवड), लखनकुमार वाव्हले (सहा.पोलिस निरीक्षक) उपस्थित होते. तर पारितोषिक वितरण सुहास पाटील ( उपसंचालक क्रीडा व युवक सेवा म राज्य ), कैलास कदम (पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी), शिवाजीराव साळुंखे (सचिव -शालेय खेळ क्रीडा बचाव समिती म राज्य) बॉक्सिंडोचे जनक संजय गव्हाले, सचिव शाम भोसले आदी मान्यवरांच्याहस्ते एनआरसी मोहोने टीमला दुसऱ्या क्रमांकाची च्याम्पियन ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
मोहोनेच्या खेळाडूंनी केलेल्या दैदीप्यमान कामगिरीमुळे सर्व खेळाडूंचे व प्रदीर्घ कराटेचा अनुभव असलेले प्रशिक्षक संतोष निरभवने ६ डिग्री ब्लेक बेल्ट यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.