कल्याण-पावसाळ्य़ापूर्वी कल्याण डोंबिवलीतील नालेसफाईच्या कामाला महापालिका प्रशासनाने लवकर सुरुवात केली. नालेसफाईचे काम आत्तार्पयत 30 टक्के पूर्ण झाले आहे. संपूर्ण नाल्यांची सफाई 31 मे र्पयत पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
महापालिका आयुक्तांनी आज नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शहर अभियंत्या सपना कोळी देवनपल्ली यांच्यासह अन्य अभियंते उपस्थित होते. आयुक्तांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी स्टेशन परिसरातील सांगळे वाडी येतील भला मोठय़ा नाल्याची पाहणी केली. त्याचबरोबर लोकग्राम येथील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. नाल्यात पोकलेन आणि जेसीबी उतरवून काम केले जात आहे की याची प्रत्यक्ष पाहणी केली. नालेसफाईचे काम आधीच सुरु केले होते. हे काम 31 मे र्पयत पूर्ण करण्याचे लक्ष्य अधिकारी वर्गास आखून दिले आहे. शहरात 95 मोठय़ा आकाराचे नाले आहेत. त्यांची लांबी 97 किलोमीटर र्पयत आहे. नालेसफाईचे काम विभागून विविध कंत्रटदाराना दिले आहे. हे काम यंदा 3 कोटी 75 लाख रुपये खर्चाचे आहे. मागच्या वर्षी नालेसफाईच्या कामावर 3 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च झाला होता. कंत्रटदार नाल्यातून किती क्यूबीक मीटर गाळ काढतो. त्याच्या प्रमाणानुसार त्याला केलेल्या कामाचे बील दिले जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. हा नियम मागच्या वर्षीही होती. तोच यंदाही कायम ठेवण्यात आला आहे.