इम्तियाज खान
कल्याण अडिवली पिसवली परिसरात अग्निशमक तसेच रुग्णवाहिका येण्यास रस्ता उपलब्ध नसल्याने आक्रमक आई एकविरा महिला मंडळाच्या महिला संघटनेने काढला मोर्चा
कल्याण कोळशेवाडी अडिवली पिसवली परिसरातील राजाराम पाटील नगर, ते प्रदिप नगर, नमस्कार ढाबा रोड ऑक्सिलियम हॉस्पिटल रोडची अवस्था अत्यंत खराब असल्याने या रस्त्यावरून एखाद्या घरात आग लागली किंवा एखादा व्यक्ती आजारी असला तर येणारी अग्निशामक दलाची गाडी व रुग्णवाहिका येणे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात तारेची कसरत वाहन चालकाला करावे लागत आहे याबाबत कल्याण पूर्व येथील एकविरा महिला मंडळ च्या माध्यमातून व स्थानिक समाजसेवक राहुल पाटील यांच्या माध्यमातून महानगरपालिकेला अनेक तक्रारी करण्यात आल्या मात्र पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर संतपलेल्या महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका बाहेर मोर्चा काढत आंदोलन केले यावेळी मुख्यालय बाहेर महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत येत्या पंधरा दिवसात या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील या महिलांनी यावेळी दिला