आरोपीला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रेल्वे फलाटावर उभी असताना महिलेला तरुणाने येऊन विचारले. तु मला ब्लॉक का केले. इतक्यात महिलेचा पती आला. पती आणि तरुणामध्ये जोरदार राडा झाला. कल्याण जीआरपी पोलिसांनी महिलेची छेड आणि पतीसोबत हाणामारी करणाऱ्या तरुण रोहित गायकवाड याला अटक केली आहे. रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
उल्हासनगरात राहणाऱी एक महिला तिच्या पतीसोबत डोंबिवलीला जाण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात पाोहचली. संध्याकाळी साडे चार वाजता पती पत्नी गाडीच्या प्रतिक्षेत होते. यावेळी पती पाण्याची बाटली घेण्याकरीता कॅन्टीनकडे गेला. याचवेळी एक तरुण महिलेच्या जवळ आला. त्याने सांगितले की, तू मला ब्लॉक का केले आहे. इतकीच विचारणा केली. तितक्यात तिचा पती आला. महिलेने सांगितले की, हा मला विचारतो. की, पतीने त्याला जाब विचारला. यातून वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. नागरीकांनी त्यांची हाणामारी सोडविली. या प्रकरणी विठ्ठलवाडी स्टेशनवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने रोहित गायकवाड या तरुणाला ताब्यात घेतले. कल्याण जीआरपी पोलिसांनी रोहीत गायकवाड याच्या विरोदात ३५४, ३५४ ड आणि ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली. बूुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे.