इम्तियाज खान
कल्याण पश्चिम येथील: दुर्गाडी गणेश घाटावरील केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे बॅनर कुणी अज्ञात इसमाने फाडल्याने भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते खासदार निधीतून साकारण्यात आलेल्या कल्याण मधील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात येणार आहे..दुर्गाडी गणेश घाट परिसरात सुशोभीकरनाच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन आज केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . मात्र त्यापूर्वीच कुणी अज्ञात इसमाने त्याच्या उद्घाटनचा बॅनर फाडल्याचे समोर आले आहे . याप्रकरणी स्थानिक माजी नगरसेवक वरून पाटील यांनी सांगीतले, चांगल्या कामाचे बॅनर फाडले याचं दुःख आहे .
कपिल पाटील यांच्या हस्ते आज कल्याण मधील विविध विकास कामांचा लोकार्पण होणार आहे .त्यांनी कल्याण मधील रस्त्यांसाठी कोट्यवधीचा निधी दिलाय… विकास कामे होतायत त्यामुळे काही विघ्नसंतोशी असंतुष्ट लोकांनी हे कृत्य केलंय असा आरोप केला. नव्या बॅनर लावून हा उद्घाटन कार्यक्रम परत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे