डोंबिवली मधील संतापजनक घटना

Uncategorized

सहा वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणारा नराधम गजाआड

Anchor : – सहा वर्षाच्या निरागस चिमुकली सोबत असेल चाळे करणाऱ्या नराधमाला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. कुंदन चौहान असे या नरधमाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथे राहणार आहे.या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे .

व्हिओ : सदर पीडित सहा वर्षाची चिमुकली डोंबिवली पूर्व परिसरात आपल्या कुटुंबासह राहते. आरोपी कुंदन चौहान हा त्याच परिसरात आपल्या नातेवाईकांकडे चार दिवसांसाठी राहण्यासाठी आला होता.. या विकृताची वाईट नजर या चिमुकलीवर पडली.. पिडीतेची आई बाहेर गेलेले असताना संधी साधून कुंदन ने पीडित मुलीला आपल्या घरी नेले व तिच्यासोबत अश्लील चाळे केले.. पीडितेची आई घरी परतल्यानंतर तिच्या मुलाने पीडित मुलगी ही कुंदन यांच्या घरात असल्याचे सांगितले.. त्यांनी कुंदनचा दरवाजा ठोकवला मुलीने रडतडत दरवाजा उघडला.. त्यामुळे पीडितेच्या आईला संशया आला . त्यांनी पीडित मुलीला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.. पीडितेच्या कुटुंबीयांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली . या तक्रारीनुसार पोलिसांनी कुंदन चौहान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *