निळजे गावातील जेष्ठ ग्रामस्थांची आमदार राजू पाटील यांच्या समोर स्पष्टोक्ती
१० गावांच्या योग्य नियोजनासाठीव एकत्रित विकासासाठी ग्रोथ सेंटर गरजेचं असल्याचं ग्रामस्थांच मत
ग्रोथ सेंटरच्या बाजूने सर्वात पहिला मनसे पक्ष व राजू पाटील राहिले- आ. राजू पाटील
Kalyan कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या १० गावांमध्ये ग्रोथ सेंटर प्रस्तावित आहे. यासाठी एमएमआरडीएने आराखडा देखील तयार केला आहे. मात्र २७ गाव सर्वपक्षीय समितीचा विरोध असल्याने ग्रोथ सेंटर हे रखडले होते. मात्र सोमवारी मनसे आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधी मधून निळजे गावात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच व जेष्ठ नागरिक भूमिका स्पष्ठ करून ग्रामीण भागाच्या योग्य नियोजनासाठी आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने ग्रोथ सेंटरची मागणी केली आहे. त्यामुळे सर्व पक्षीय समिती नेहमी ग्रोथ सेंटरच्या विरोधाच्या भूमिकेत आपली मागणी करत असताना आता ग्रोथ सेंटरचा वस्तुस्थिती दर्शक अभ्यास करणारी जनता मात्र ग्रोथ सेंटरचे समर्थन करू लागली आहे. बहुतांशी युवकही पाठिंबा देताना दिसून येत आहेत.
२०१५ साली राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. १० गावातील १ हजार ८९ हेक्टर जागेवर कल्याण ग्रोथ सेंटर उभारले जाईल. त्यासाठी १ हजार ८९ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता. मात्र अद्याप ग्रोथ सेंटरची एक वीटही रचली गेली नाही. २७ गाव सर्वपक्षीय विकास समिती या ग्रोथ सेंटरला सतत विरोध करत असल्याने हा प्रकल्प सध्या रखडला आहे. मात्र या प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठा फायदा होणार आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी आणि जमिनीचे देखील योग्य नियोजन करून वाढीव एफएसआय मिळणार आहे. मात्र काही राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे सध्या ग्रोथ सेंटर हा रखडलेला आहे. ग्रोथ सेंटरची निर्मिती झाल्यास गावांचा योग्य नियोजन होऊन आराखडा नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर होणार आहे. मात्र जनतेचा पाठिंबा आता ठीक ठिकाणी दिसून येत आहे. सोमवारी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असेल्या निळजे गावात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनासाठी आले होते. यावेळी निळजे गावातील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व माजी सरपंच कृष्णा पाटील यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी आमदार राजू पाटील म्हणाले कि ' ग्रोथ सेंटरच्या पहिल्या बैठकीला मी उपस्थित होतो. यावेळी सर्वानी या ग्रोथ सेंटरला विरोध केला होता. मात्र ग्रोथ सेंटर बाबत अभ्यास करून मुळ संकल्पनेत बदल करून काही सुधारणांसह ग्रोथ सेंटरला मान्यता देण्या बाबत भूमिका मांडली होती. आता स्थानिकांनाही महत्व पटू लागले आहे. मात्र मी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन ग्रोथ सेंटरला पाठिंबा दर्शवला होता. मनसे हा एकमेव पक्ष ग्रोथ सेंटरच्या बाजूने उभा होता. ग्रोथ सेंटरला विरोध करत असताना त्याचा अभ्यास करणे खूप गरजेचं असल्याचं मत आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केलं होत.
प्रतिक्रिया
” आपल्या इथे होऊ घातलेला ग्रोथ सेंटर आहे. जो २०१६ साली जाहीर झाला होता. त्या संदर्भात निळजे गावात बैठक झाली होती. त्यावेळी एमएमआरडीएचे तत्कालीन मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका मांडली शेतकऱ्यांनी त्यांची भूमिका मांडली परंतु त्या नंतर त्यावर कोणताही विचार झालेला नाही. आता परिस्थिती अशी झाली कि शेतकऱ्यांच्या जमिनी तश्याच राहिल्या आहेत. इथे कोणत्याही नवीन बांधकामाला परवानगी मिळत नाही. जर परिस्थितीत अशीच राहिली तर शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या आपली जमीन विकल्या शिवाय दुसरा कोणता पर्याय राहणार नाही. जमीन विकताना देखील योग्य असा दर मिळत नाही. कवडीमोल भावाने जमिनी विकल्या जात आहेत. माझं असं मत आहे कि ग्रोथ सेंटरचा या भागातील सर्व लोकप्रतिनिधीनी एकत्र बसून विचार केला आणि आपली भूमिका शासनाच्या समोर मांडली त्यामधून चांगला मार्ग निघेल. या ग्रोथ सेंटर मुद्दे शिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळतील आणि अशिक्षित तरुणांना रोजगार मिळतील. शेतकऱ्यांना आपल्या मालकी हक्काच्या जागेत घर बांधता येतील. असं माझं मत आहे. “
–बाळकृष्ण पाटील , माजी सरपंच निळजे