पोलीस व्हॅन मध्ये केक कापण्याच्या घटनेला वेगळे वळण

Uncategorized

Anchor : कल्याण न्यायालयात एका सराईत गुन्हेगाराने पोलिस व्हॅन मध्ये केक कपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झाला आहे मात्र पोलिस या घटनेला आता वेगळे वळण लागले आहे .पोलिस व्हॅन मधून कुख्यात गुंड रोशन झा हा केक कापायचा प्रयत्न करतो मात्र पोलिस त्याचा हात मागे घेतात , केक कापून देत नाहीत अस व्हिडियो स्पष्ट होत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली .

कल्याण कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या रोशन झा याला काल दुपारच्या सुमारास कल्याण न्यायालयात आणलं होतं याच दरम्यान या रोशन झाचे 60 ते 70 समर्थक कल्याण न्यायालयात हजर होते .वारंवार रोशन च्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी त्यांना वारंवार विरोध केला . काल रोशन यांचा वाढदिवस होता त्यामुळे समर्थ केक घेऊन आले होते. अखेर फक्त बघण्याच्या वाहनाने समर्थक जवळ आले अचानक एका समर्थकाने केक वर केला याचवेळी मध्ये बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्ष गेलं त्यांनी तत्काळ रोशनीचा हात मागे घेतला दरम्यान अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय . हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक सराईत गुन्हेगार पोलीस संरक्षणात केक कसा कापू शकतो असा सवाल उपस्थित झालाय .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *