भारतीय जनता पार्टी ही विचारांवर उभी आहे, राजकारणात पक्षाला एक विचार असावा लागतो आणि राष्ट्रप्रथम हा भाजपाचा विचार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाची घोडदौड सुरूच आहे, सातत्याने होणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपा नंबर एकला राहिला आहे, घवघवीत यश मिळाले आहे, मात्र येणाऱ्या काळातही चांगले यश मिळविण्यासाठी भाजपाची बूथ रचना पूर्ण झाली पाहिजे, बूथ जर सशक्त झाले तर विजयाचा मार्ग सोपा होणार आहे, बूथ समिती जर मजबूत झाली तर भाजपाला कोणीही रोखू शकत नसल्याचे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
तलासरी जि. पालघर येथे भारतीय जनता पार्टीचा बूथ सशक्तीकरण प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला, दरम्यान त्या वर्गामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, ज्येष्ठ नेते बाबाजी कथोले, मा. हरिश्चंद्र जी भोये – राष्ट्रीय कार्य सदस्य अनुसुचित जमाती मोर्चा, मा. हेमंतजी सवरा – सरचिटणीस प्रदेश अनुसूचित जमती मोर्चा, मा. भरतजी रजपूत – डहाणू नगराध्यक्ष, श्री.सुशीलजी औसरकर व श्री.कमलेशजी मराठे- जिल्हा सरचिटणीस, श्री. विनोदजी मेढा – तलासरी मंडळ अध्यक्ष, सौ. जयवंतीताई गोरखणा – जिल्हा सचिव, श्री. समीरजी पाटील युवा मोर्चा अध्यक्ष, व जिल्हा पदाधिकारी, मोर्चा / आघाडी अध्यक्ष-सरचिटणीस, जिल्हा प्रकोष्ठ संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.