कल्याण पूर्वेतील आशेळे गावातील घटना
पैसे भरून ही मीटर नाही ..आमदार गणपत गायकवाड संतापले
महावितरण अधिकाऱ्यावर आमदारांची आगपाखड
जोपर्यंत मीटर देत नाही …तोपर्यंत इथून हलणार नाही
कल्याण ग्रामीण : सहा महिन्यापूर्वी पैसे भरून देखील वीज कनेक्शन न मिळाल्याने कल्याण पूर्व आशाळे परिसरातील काही इमारतींमधील रहिवाशांना अंधारात राहावे लागतेय. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी आज परिसरात जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला जोपर्यंत या रहिवाशांना वीज पुरवठा होत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी टेबल खालून पैसे घेतलेल्याना मीटर देण्यात येते व सरकारी नियमानुसार ज्यांनी पैसे भरले त्यांना मीटर दिले जात नाही असा गंभीर आरोप केला..याबाबतचा व्हिडिओ आसल्याचा देखील खुलासा त्यांनी केला . याबाबत घटनास्थळी असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत चौकशी करून उचित कारवाई केली जाईल व या रहिवाशांना वीज कनेक्शन देण्यात येईल असे आश्वासन दिले
कल्याण पूर्व आषेळे परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून काही इमारतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे .वीज चोरी प्रकरनी बिल्डर विरोधात महावितरणने कारवाई केली .मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.. पैसे भरल्यानंतर सहा महिने उलटून गेले तरी अद्याप मीटर कनेक्शन न दिल्याने येथील नागरिकांना सहा महिन्यापासून अंधारात राहावे लागतेय. याबाबत आज स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी परिसरात जाऊन महावितरण अधिकार्यांना धारेवर धरत त्यांना जाब विचारला.. जोपर्यंत वीज पुरवठा केला जात नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका आमदार गणपत गायकवाड यांनी घेतले.. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी टेबल खालून पैसे घेऊन मीटर लावले जातात कायदेशीर रित्या पैसे भरलेल्यांना मीटर दिले जात नाही असा गंभीर आरोप महावितरणवर केला .याबाबतचा व्हिडियो असल्याचे देखील आमदारांनी सांगितले कसा प्रकारे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांचा कामकाज कशा प्रकारे सुरू याचा खुलासा देखील आमदार गायकवाड यांनी अधिकारी वर्गाचा समोर केला .तर याबाबत महावितरण सावध पवित्र घेत याची चौकशी केली जाईल व या इमारतीचे रहिवाशांना तत्काळ वीज कनेक्शन दिली जाईल असे सांगितले