ठाणे : यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड केल्याचा आक्षेप संभाजी राजे यांनी केला आहे. त्यानंतर आज संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्ह्यामधून ‘हर हर महादेव’ चित्रपटावर ब्रिगेड आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाध्यक्ष सतीश चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील व्हिवियाना मॉल, कोरम मॉल, इथरनिटी मॉल, इन्फिनिटी मॉल तसेच जिल्ह्यातील इतर शहरांमधील मॉल मध्ये या चित्रपटांबाबत आक्षेप घेत हे चित्रपट बंद करण्याचे निवेदन देण्यात आले .
प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा बहुचर्चित ‘हर हर महादेव’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याने संभाजी बिग्रेड संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि मिताली महाजन यांच्या चित्रपटावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी आक्रमक होत तर काही ठिकाणी शांततापूर्वक निवेदन देत या चित्रपटाचा शो बंद पाडला आहे. सध्या सोशल मीडियावर हर हर महादेव आणि महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात यांच्या चित्रपटावर मोठा वाद सुरु झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश चंद्रकांत देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘हर हर महादेव’ चित्रपटावर आक्षेप घेतला. “हर हर महादेव’ या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड होत आहे.तर हे असे चित्रपट लोकांच्या समोर घेऊन यायचं. छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य घडवून दिलं. मात्र, आपल्याला चित्रपट बनवण्याचा अधिकार आहे, म्हणून इतिहासाची मोडतोड करायची का?”, सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी सिनेसृष्टीला विचारला आहे.
यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश चंद्रकांत देसाई , ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सतीश पाटील, ठाणे महानगर अध्यक्ष सुजय सावंत, ईशान्य मुंबई अध्यक्ष प्रतीक सकपाळ, कल्याण डोंबिवली नगर अध्यक्ष अशोक गवळी, शहापूर तालुका अध्यक्ष निखिल भोईर, जयेश सुरळकर, सागर सुरळकर,सविन गवई, मुकुंद चव्हाण, रोहित गायकवाड, महेश पालव, सुनील हांडे, आकाश डुंबरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.