कल्याणमध्ये एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन
बडे गृह प्रकल्प तयार करणारे 35 बिल्डर होणार सहभागी

कल्याण पॉलिटिक्स सोसीअल

कल्याण-एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये येत्या 19 ते 22 मे दरम्यान प्रॉपर्टी एक्सो 2022 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघनटेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी दिली आहे.
या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष शितोळे यांनी ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी जयेश तिवारी, अरविंद वरक, सुनिल चव्हाण, राहूल कदम, दिनेश मेहता, राजेश गुप्ता, रवी पाटील, रोहित दिक्षीत, संजय पाटील, अनिरुद्ध पाटील आदी उपस्थित होते. अध्यक्ष शितोळे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीत 40 ते दीड लाख रुपये किंमतीची घरे आहेत. सीटी सेंटरीकमध्ये ही किंमत आहे. तर शहराच्या आऊट स्कर्टमध्ये 20 लाखापासून घरे उपलब्ध आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत परवडणारी घरेही निर्माण केली जात आहेत. कोरोना काळानंतर घर खरेदीत तेजी पाहावयास मिळत आहे.

बिल्डरांकडून वसूल केला जाणारा एलबीटी आणि मेट्रो सेस कर रद्द करावा

कल्याण-राज्य सरकारकडून स्टॅम्प डय़ूटीच्या माध्यमातून एलबीटी कर वसूल केला जातो. तसेच मेट्रो सेसही वसूल केला जात आहे. ही कर वसूली बिल्डरांकडून वसूल केली जात असला तरी राज्य सरकारच्या धोरणानुसार परवडणारी घरे देण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. त्यामुले एलबीटी आणि मेट्रो सेस कर वसूली रद्द करावी अशी मागणी कल्याण डोंबिवली एमसीएचआयचे या बिल्डर संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *