कल्याण-धावत्या लोकलमध्ये प्रवाशाला लूटणा:या चोरटय़ाला कल्याण रेल्वे पोलिसानी अटक केली आहे. साहिल गुप्ता असे या चोरटय़ाचे नाव असून साहिल हा सराईत चोरटा असल्याचे बाब समोर आली आहे.
एक प्रवासी महिला तिच्या पतीसोबत कजर्तच्या दिशेने जाणा:या लोकलमध्ये प्रवास करीत होती. लोकलमध्ये गर्दी होती. महिलेने तिचा मोबाईल तिच्या पतीकडे दिला. उल्हासनगर स्थानकात गाडी येताच एक चोरटा गर्दीचा फायदा घेत गाडी शिरला. त्याने महिलेच्या पतीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. आरपीएफ जवान आणि रेल्वे पोलिसाने पाठलाग करीत चोरटय़ाला पकडले. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, साहिल गुप्ता असे चोरटय़ाचे नाव असून तो सराईत चोरटा आहे. साहिल याने चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.