कल्याण-राज्यातील महापालिकेच्या निवडणूका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहितीय याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी दिली आहे.
महापालिकेच्या निवडणूका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. निवडणूका एक सदस्य पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी याचिकाकर्ते पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पाटील यांच्यासह राज्यभरातून अन्य सहा जणांनी याच प्रकारची मागणी करणा:या याचिका दाखल केल्या होत्या. निवडणूका कोणत्या आणि कशा प्रकारे घ्याव्यात याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. मात्र राज्य सरकारने मुंबई महापालिका वगळता राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये त्रिसदस्य पद्धतीने निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्दबातल ठरविण्यात यावा. कारण राज्य सरकारला निवडणूकीसंदर्भात निर्मण घेण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान मागच्याच आठवडय़ात येत्या पंधरा दिवसात निवडणूका घेण्याचा निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या सगळया पाश्र्वभूमीवर पाटील यांच्यासह सात जणांच्या याचिका उच्च न्यायालयाने डिसमिस केल्या आहेत. यासंदर्भातील सुनावणी मागच्या आठवडय़ातील शुक्रवारी झाली. मात्र सुनावणीची आदेश लेखी प्रत आद्यप हाती आलेला नाही. लेखी प्रत हाती येतात. त्यामध्ये न्यायालयाने आदेश प्रतीमध्ये काय मुद्दे अधोरेखित केले आहे. याचा कायदेशीर अभ्यास करुन या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे पाटिल यांनी सांगितले.