कल्याण, लोकलच्या प्रतिक्षेत फलाटावर बसलेल्या एका प्रवाशाला झोप आली. या संधीचा फायदा घेत एका चोरट्याने प्रवाशाच्या गळ्यातून महागडी चैन आणि मोबाईल हिसकावून पसार झाला. कल्याण जीआरपी पोलिस आणि आरपीएफ पथकाने या चोरट्याला सीसीटीव्हीच्या सहाय्याने बेड्या ठाेकल्या आहे. सुनिल सोनावणे असे या चोरट्याचे नाव आहे. तो टिटवाळा येथील नांदप गावचा रहिवासी आहे. उच्च शिक्षित असलेल्या या चोरट्या सुनिल सोनावणे याच्याकडे पत्रकार असल्याचे ओळखपत्रही सापडले आहे. या आधीही त्याने काही चोरीच्या घटना केल्या आहेत का या अंगाने पोलिस तपास करीत आहेत.
कल्याण नजीक असलेल्या शहाड रेल्वे स्थानकात फलाटावर गिरीश पडवळ या नावाची व्यक्ती टिटवाळयाला जाण्याकरीता रेल्वे गाडीच्या प्रतिक्षेत होती. फलाटावर बसले असताना त्यांना झोप लागली. ते झोपले असल्याचे पाहून एकाने त्यांच्या गळयातील सोन्याची चैन आणि त्यांचा मोबाईल घेऊन पसार झाला. गिरीश पडवळ यांनी या घटेनची तक्रार कल्याण जीआपीमध्ये केली. जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अभिजीत जगताप यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या चोरट्याच्या शोधाकरीता कल्याण आरपीएफ जवानांनी मोहिम सुरु केली. पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही लागला. त्यामध्ये एक व्यक्ती दिसून आला. पोलिसांनी पूढील तपास सुरु केला. पाच तासात अखेर सुनिल सोनावणे या नावाच्या व्यक्तिला पोलिसांनी शोधून काढले. त्यानेच ही चोरीची घटना केल्याची कबूली पोलिसांना दिली. त्याची अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता तो कैटरिंगचा काम करतो. तो स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगतो. त्याच्याकडे पत्रकाराचे ओळखपत्र सापडून आले आहे. सुनिलने या आधी अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का या अंगाने पोलिस तपास करीत आहेत.