पोलिसांनी भंगार माफियांवर कारवाई करीत चोरीचे भंगार जप्त केले. मात्र दोन पोलिसांनी या चोरीच्या भंगाराला पुन्हा भंगार माफियांना विकले. हा धक्कादायक प्रकार टिटवाळा पोलिस ठाण्यात घटला आहे. कारनामा करणा:या दोन्ही पोलिस कर्मचा:यांची बदली ठाणो ग्रामीण कंटोलला करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस कर्मचा:याचे नाव सोमनाथ भांगरे आणि शरद आव्हाड असे आहे.
सध्या टिटवाळा पोलिस ठाणो चर्चेत आहे. गुरुवारी पहाटे पोलीस गस्त घालत असताना पोलिसांची जीप रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला धडकली. या घटनेत महिला पोलिस अधिकारी स्वाती जगताप या जखमी झाल्या. हा प्रकार ताजा असताना आत्ता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार टिटवाळा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने भंगार माफियाच्या विरोधात कारवाई केली. त्याच्याकडून काही भंगार जप्त केले. या कारवाईत टिटवाळा पोलिसांनी जप्त केलेले चोरीचे भंगार या दोन पोलिसांनी पुन्हा भंगार माफियाना विकले. ही माहिती समोर येताच पोलिस कर्मचारी सोमनाथ भांगरे आणि शरद आव्हाड यांना ठाणो ग्रामीण कंट्रोलला पाठविले आहे. ही घटना गंभीर असल्याने या प्रकरणाची चौकशी पोलिस उपाधीक्षक करीत आहेत.