कल्याण ग्रामीण मध्ये २०० उत्तर भारतीयांचा मनसेत प्रवेश

Uncategorized

कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

कल्याण ग्रामीण भागात उत्तरभारतीयांचा मनसे प्रवेश

  राज्यातील सुरू असलेल्या पक्षांतर्गत राजकीय श्रेयवादाच्या जाचाला कंटाळून २०० उत्तर भारतीयांनी मनसेत पक्ष प्रवेश केला आहे.कल्याण ग्रामीण मधील सागाव चिरा नगर परिसरातील शेकडो उत्तर भारतीयांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहिर प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत उत्तरभारतीय बांधवांनी मनसेत प्रवेश केला आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्षांतर्गत वाद उफाळुन आले आहेत. यामध्येच राजकीय नेत्यांच्या भांडणात सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र हैराण झाले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या या अंतर्गत वादांमुळे कल्याण ग्रामीण मध्ये हिंदुत्वाचा जयजयकार करत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व मनसे आमदार प्रमोद( राजू) पाटील यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन उत्तर भारतीयांनी शनिवारी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदारांच्या कार्यालयात किशोर महावर, मनोज सिंग, राजकुमार सिंग, संदीप पांडे, पवन शुक्ला, अजित चौबे यांसह कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे. यावेळी मनसे उप जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील,डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत,दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे,उप जिल्हा सचिव अनंता म्हात्रे,डोंबिवली शहर संघटक तकदीर काळण, उप शहर अध्यक्ष प्रभाकर जाधव, दिवा उप शहर प्रमुख दिनेश पाटील,विभाग अध्यक्ष शरद पाटील, रोहित भोईर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कल्याण ग्रामीण भागातील सागावं ,चिरानगर परिसरातील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला नंतर पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करण्याची तयारी सुरू करत असल्याचे देखील जाहीर केलं आहे.त्यामुळे ज्वलंत हिंदुत्वाच्या प्रश्नी परिसराच्या विकासासाठी कटीभद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत उत्तरभरतीयांनी प्रवेश केला आहे.यावेळी कार्यकर्ते व त्यांच्या परिसरातील समस्या तातडीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटीबद्ध असेल असं मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *