घरफोडी करण्यासाठी आलेल्या तीन चोरट्या पैकी एका चोरट्याला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पकडण्यात आलेल्या चोरट्याकडून चोरीच्या कामासाठी येणारी सामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्या वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
आज दुपारी कल्याण पश्चिम येथील रहेजा परिसरात एका बिल्डिंगमध्ये तीन जण शिरले. काही नागरिकांची नजर या तिघांवर पडली. काही नागरिकांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला मात्र काही विचारण्या पूर्वीच दोन जण पळाले. मात्र एक तरुण नागरिकांच्या हाती लागला. त्याच्याकडे काही वस्तू सापडल्या . या वस्तूंच्या वापर घरफोडी करण्यासाठी केलं जात. नागरिकांच्या लक्षात आले की तिघे चोरटे होते,त्यापैकी दोन पसार झाले आहे. आणि एक त्यांच्या हाती लागला आहे. एका घराचे कुलुप देखील चोरट्याने तोडले होते. नागरिकांनी एका चोरट्याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. जेव्हा या चोरट्याला कल्याणच्याp रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जवळपास एक तास त्यांनी बेशुद्ध असल्याचे ढोंग केले. पुढील तपास महात्मा फुले पोलीस करीत आहे. पकडण्यात आलेला चोरटा हा दिल्लीच्या असल्याचे बोलले जात आहे . त्यांचे दोन साथीदार कोण आहेत. या लोकांनी आतापर्यंत किती घरफोड्या केले आहेत आहे याचा तपास पोलीस घेत आहे.