बिल्डर फसवणूक प्रकरणात आत्ता ईडीची एन्ट्री होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे केवळ बिल्डर नाही अधिका:यांची देखील या प्रकरणात सखोल चौकशी जोर्पयत होत नाही. तो र्पयत या प्रकरणाला न्याय मिळणार नाही निपक्षपणो हा घोटाळा उघड झाला आहे. ज्या लोकांची आणि शासनाची फसवणूक झाली हे समोर आली पाहिजे असी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रत आत्तार्पयत 65 बिल्डरांकडून खोटय़ा कागदपत्रंच्या आधारे रेरा प्रमाणपत्र मिळवून सरकारची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात ठाणो गुन्हे शाखेची एसआयटी चौकशी करीत आहे. या प्रकरणात सरकारची फसवणूक झाली आहे. अशा प्रकरणात जिथे सरकारची फसवणूक होते. सरकारचा कर बुडविला जातो. याची माहिती ईडीला दिली जाते. हे प्रकरण मोठे घोटाळा असल्याची शक्यता असल्याने या प्रकरणात आत्ता ईडी एंन्ट्री झाली आहे. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने संबंधित प्रकरणाची कागदपत्रे ईडीकडे देण्यासाठी केडीएमसी आयुक्त आणि एसआयटी अधिकारी वर्गास पत्र व्यवहार केला आहे. प्राथमिक माहिती समोर येते की, एसआयटीने काही माहिती ईडीकडे पुरविली आहे. आत्ता ईडी काय करणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र मनसे आमदार राजू पाटील यांनी या प्रकरणात संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे. रेरा नाही अवैध बांधकामात केवळ बिल्डर नाही तर महापालिकेच्या अधिका:यांची चौकशी झाली पाहिजे. गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. जोर्पयत संपूर्ण चौकशी होत नाही. जी चर्चा सुरु आहेत. ईडीने या प्रकरणात एट्री केली. असे असेल तर ही बाब स्वागतार्ह आहे.