कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन बनावट बांधकाम परवानग्या मिळविल्या. या परवानग्यांच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडे बांधकामाचे नोंदणी प्रमामपत्र मिळविले. या प्रकरणात 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीतील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. या प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली आहे. तसेच ईडीने महापालिकेकडे या प्रकरणातील कागदपत्रंची मागणी केलेली आहे. या प्रकरणातील तक्रारदार आणि हे प्रकरण उघड करणारे वास्तू विशारद संदीप पाटील यांना आत्ता धमक्यांचे फोन कॉल्स येऊ लागले आहे. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका असून पोलिसांकडे त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.
वास्तूविशारद पाटील यांनी माहिती अधिकारात बिल्डरांकडून करण्यात आलेल्या फसवणूकीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात त्यांनी महापालिकेसह रेरा प्राधिकरणाकडे तक्रार केली. त्याचबरोबर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात महापालिका प्रशासनासह रेरा प्राधिकरणाची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिस ठाण्यात 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाच्या तपासाकरीता एसआयटी नेमली आहे. ही सगळी पाश्र्वभूमी असताना या प्रकरणात ईडीने महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणातील कागदपत्रंची मागणी केली. आत्ता या प्रकरणातील तक्रारदार पाटील यांना धमक्याचे फोन कॉल्स सुरु झाले आहे. त्यांनी या तक्रारी केल्या तेव्हापासून त्यांना काही अनोळखी नंबरहून फोनद्वारे धमकाविले जात आहे. याची कल्पना एका अर्जाद्वारे पोलिस उपायुक्तांना देण्यात आली आहे. पाटील यांच्या जिविताला धोका असल्याने त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. या संदर्भात पाटील यांनी सांगितले की, अनेकांना पोलिस बंदोबस्त दिला जातो. काही सशल्क पोलिस बंदोबस्त दिला जातो. मी मागणी करुनही मला पोलिस बंदोबस्त दिला गेलेला नाही. त्यामुळे माङयासोबत काही अनुचित प्रकार घडण्याची पोलिस प्रशासन वाट पाहत आहे का असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.