सासूमुळे दुसरी पत्नी निघून गेली म्हणून जावयाने सासूला धडा शिकविण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. मात्र कोळसेवाडी पोलिसांनी संदीप गायकवाड नावाच्या जावयाला शोधून काढले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या बनावात सामिल असलेले संदीप गायकवाड याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.
कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका परिसरात संदीप गायकवाड नावाचा व्यक्ती राहतो. त्याला दोन बायका आहे. त्या वेगवेगळ्य़ा धर्माच्या आहेत. अचानक त्याची एक पत्नी निघून गेली. त्यामुळे संदीप गायकवाड हा हैराण होता. अचानाक ही माहिती समोर आली की, संदीप गायकवाड याचे अपहरण झाले आहे. प्रकरण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पोहचले. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी हरीदास बोचरे आणि दिनकर पगारे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणात काही लोकांना ताब्यात घेत विचारपूस करण्यात आले. या चौकशीत समोर आाले की, हे अपहरण नसून अपहरणाचा बनाव आहे. जोर्पयत संदीप भेटत नाही. तोर्पयत पोलिसांनी अपहरणाच्या अँगलने तपास सुरु ठेवला. अखेर पोलिस अधिकारी दिनकर पगारे यांच्या पथकाने संदीप गायकवाडला शोधून काढले. जी हकीगत समोर आली ती धक्कादायक आहे. संदीप याच्या दोन बायका आहेत. त्यापैकी एक बायको निघून गेली. माझी दुसरी पत्नी तिच्या आईमुळेच निघून गेली आहे. हा राग संदीपच्या मनात होता. त्याचा राग काढण्यासाठी आणि सासूला धडा शिकविण्यासाठी त्यांनी बनाव केला. बुरखा घालून काही लोकांसोबत निघून गेला. सत्य समोर आल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी बनाव करणारा संदीप गायकवाड याच्यासह त्याचे साथीदार जावेद खान, आकाश अभंग आणि अवि पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
Byte महेंद्र देशमुख. वरिष्ठ पोलीस निरीक्षक