मनसे आमदार राजू पाटील यांचे विधान
डोंबिवलीतील फडके रोडवर सर्वांनी कार्यक्रम करावेत. उद्या होणा:या कार्यक्रमाला माझ्याकडुन शुभेच्छा आहेत. त्यांची इच्छा असेल तर आम्ही केलेल्या रोषणाईचा अर्धा खर्च देऊ शकतात, असे गंमतीने मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्या होणा:या बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आयोजित केलेल्या दिवाळी संगीत कार्यक्रमाविषयी त्यांने हे भाष्य केले आहे. आाज मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून डोंबिवलीतील फडके रोडवर रोषणाईचे उद्घाटन करण्यात आले. याच रोडवर उद्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी संगीत कार्यक्रमाचे आायोजन आहे. महागाईचे दुखणे, खराब रस्ते आणि अव्यवस्था यातून थोडाफार दिलासा मिळावा यासाठी आम्ही रोषणाई केली आहे असे विधान आमदार राजू पाटील यांनी केले आहे.
मनसेच्या वतीने फडके रोडवर दिवाळी निमित्त रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईचा शुभारंभ आज मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. डोंबिवली मध्ये शहराध्यक्ष मनोज घरत हर्षद पाटील उपस्थित होते. यावेळी संपूर्ण परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की, दोन वर्षाच्या गॅपनंतर पूर्ण उत्साहाने दिवाळी साजरी केली जात आहे. कोरोना काळात आपण गेल्या वर्षीही थोडी सवलत मिळाली म्हणून दिपोत्सव साजरा केला होता. राज साहेब देखील दादरला गेल्या दहा वर्षापासून दिपोत्सव साजरा करीत आहेत. त्याची आम्ही कॉपी करुन कुठे तरी एक चांगली रोषणाई केली आहे. चांगल्या गोष्टीची कॉपी करायला काही हरकत नाही. फडके रोडला एक विशेष महत्व आहे. तरुणाईचा उत्साह इथे सळळत असतो. त्या अनुषंगाने येथे येणा:या तरुण तरुणाईला दिवाळाची आनंद घेता यावा. यासाठी ही रोषणाई केली आहे. थोडा काळाकरीता तरी महागाईचे दुखणे, खराब रस्ते, इथकी अव्यवस्था यातून कुठेतरी निघून थोडाला दिलासा मिळावा. त्यासाठी हा छोटाशा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मतदारांच्या डोक्यात प्रकाश पडला की कोण चांगले आहे. कोण प्रभावीपणो कामे करु शकतो. तर आपल्या शहरात विकासचा प्रकाश पडू शकतो. सगळ्य़ा गोष्टी त्यांच्यावर अवलंबून आहेत. नागरीकांना शुभेच्छा याच देईन की, चांगले राज्य येवो. बळीराज्याचे राज्य महाराष्ट्रात येवो. जेणोकरुन शहरात राहणा:या लोकांना मुबलक धान्य स्वस्तात मिळेल. स्वस्ताई येवो.
शेतक:यांना जी मदतीसाठी जी घोषणा केली जाते. ती पोहच नाही असे मी म्हणणार की, त्यासाठी प्रामिणक प्रयत्न केले पाहिजे. याकडे आमदार पाटील यांनी यावेळी लक्ष वेधले.