कल्याण श्री मलंगगड परिसरातील विविध आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन दिपावली निमित्त या नागरिकांना छोटीशी भेटवस्तू देण्यात आली त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप खूप मला देखील आनंद झाला यात मिठाई, दिपावली साठी लागणाऱ्या पणती, रांगोळी, उटणे आदी साहित्याचा समावेश आहे यावेळी नागरिकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी समाजसेवक अनिल दादा पाटील, राम शेठ जाधव, मनोज शेठ गायकवाड, आंबेगाव सरपंच धर्मा शेठ भाग्यवंत, नकुल नाना भोईर प्रसन्न पाटील दिनेश गायकवाड व आदी मान्यवर उपस्थित होते बहुसंख्येने बाबू वाघ, दुर्गेश वाघ, गुलाब वाघ, चंदर वाघ, बाका दिघे, महादू अर्जुन, भरत चंदर, चंद्रकांत प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतांना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला देखील आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी कुणाल पाटील यांनी दिली.