इम्तियाज खान
कल्याण- कल्याण जवळील आंबिवलीमध्ये एका डॉक्टराला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या संघटनेने निदर्शन केले होळीच्या दिवशी काही लोकांनी आंबिवली स्टेशनजवळील गुरु कृपा क्लिनिकचे डॉक्टर नीरज प्रजापती यांना मारहाण केली होती. हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हत कैद झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी एक तरुण आपल्या पायावर दुखापतीच्या मलमपट्टी करण्यासाठी क्लिनिकमध्ये आला होता, मात्र मित्रांसोबत या तरुणाने डॉक्टरांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांकडून योग्य ती कारवाई करण्यात आहे तरी डॉक्टरांसोबत असे गुन्हेगारी प्रकार घडू नयेत म्हणून आंबिवलीत डॉक्टरांनी आंदोलन केले. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर आणि मेडिकल चालकांनी आपले दवाखाने आणि मेडिकल बंद ठेवून निषेध व्यक्त करत वारंवार होणारे डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यात यावे अशी मागणी केली.