इम्तियाज खान
कल्याण- जागतिक महिला दिनानिमित्त टिटवाळा येथील नांदप रोडवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमही राबवले जातात. महिला दिनाचे औचित्य साधून टिटवाळा येथील केडीएमसी प्रभाग क्रमांक 9 चे अध्यक्ष कमलेश नांगरे यांच्या प्रयत्नाने नांदप गाव व मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले या सर्वांच्या चाचण्या झाल्या, मात्र महिला दिनानिमित्त हे शिबिर खास महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते.शिबिरात रक्तदाब, हिमोग्लोबिन, कावीळ, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, मलेरिया टायफॉइडची मोफत चाचणी करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक दहाचे अध्यक्ष मोरेश्वर उर्फ अण्णा तरे, प्रभाग क्रमांक 9 च्या महिला अध्यक्षा तृप्ती गायकवाड, कार्याध्यक्ष संदीप गवारी, अल्पसंख्याक अध्यक्ष जमाल शेख, किशोर राठोड, भास्कर मोरे, भारती पिसाळ, प्रसाद चव्हाण, मोहन तरे, गणेश गायकर, मोहन कणेरी, शिर्के ताई, नलावडे ताई आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला. शिबिराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता.