वल्लीपीर रोड वरील गटारांची उंची कमी केल्याने रहिवाशांना दिलासा

Uncategorized

प्रभाग क्र. ३६ मधील नागरिकांनी मानले माजी आमदार नरेंद्र पवार यांचे आभार

कल्याण : कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रोड वरील गटारांची उंची कमी केल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला असून याबाबत भाजपा प्रभाग क्र. ३६ मधील नागरिकांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे आभार मानले आहेत.

  प्रभाग क्र. ३६ बैल बाजार परिसरातील वल्लीपीर रोडवर स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरु आहेत. यामध्ये बांधण्यात येणाऱ्या गटारांची उंची हि सुमारे ४ फुट असल्याने यामुळे येथील सोसायटीतील नागरिकांना ये जा करण्यासाठी त्रास होत होता. तसेच उंच गटारांमुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी सोसायटीमध्ये साचून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांना होती. हि बाब लक्षात घेऊन माजी परिवहन समिती सदस्य तथा भाजपा पदाधिकारी कल्पेश जोशी यांनी याबाबत माजी आमदार नरेंद्र पवार यांना सांगितले.

  नरेंद्र पवार यांनी याबाबत  केडीएमसी प्रशासन आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांशी चर्चा करत येथील गटारांची उंची कमी करण्याची मागणी केली. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन येथील गटारांची उंची कमी करण्यात आली आहे. यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला असून येथे उद्भवणाऱ्या संभाव्य पूरसदृश्य परिस्थितीतून सुटका झाली आहे. यामुळे येथील नागरिकांनी आज माजी आमदार नरेंद्र पवार यांना पुष्पगुच्छ देत आभार मानले आहेत.

  यावेळी माजी परिवहन समिती सदस्य कल्पेश जोशी, प्रभाग क्र. ३६ भाजपा वार्ड अध्यक्ष भावेश ढोलकिया, प्रकाश प्रजापती, कायदेशी सल्लागार समृद्ध ताडमारे, माजी परिवहन समिती सदस्य महेश जोशी, सागर जोशी, योगेश सोडा, सुहास शिंत्रे, महेश चीत्रोला, चेतन लहेर आदी पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *