गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला अवघ्या चार तासात अटक
Anchor : – रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत
प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या एका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केलीय. दीपक पवार असे या चोरट्याचे नाव असून त्याने आधी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत .
व्हिओ : उल्हासनगर येथे राहणारे तक्रारदार काल दुपारच्या आपल्या भावाला पनवेल-गोरखपुर एक्सप्रेस मध्ये बसवून देण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर आले होते.. एक्सप्रेस आल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची एकच गर्दी झाली.. तक्रारदार यांनी भावाचे सामान घेऊन मेलमध्ये ठेवले व त्यानंतर ते खाली उतरत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातला मोबाईल चोरला. मोबाईल चोरीला गेला हे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी त्यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध सुरू केला. अवघ्या चार तासात दीपक पवार या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली .दीपक पवार याने आधी देखील अशा प्रकारचे गुन्हे केले असावेत असा संशय व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केलाय.