महाराष्ट्रात महिला गायब होण्यामागे कोणाचे रॅकेटकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

Uncategorized

छत्रपती शिवाजी, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दर दिवशी 7क् महिला गायब केल्या जातात. कोणाचे रॅकेट आहे. ही अतिशय दुदैवी बाब आहे. डबल इंजिन सरकार ट्रबल इंजिन झाली का हा शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान केंद्र आणि राज्य सरकारीत असल्याची टिका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. प्रदीप कुरुळकर हा हनी ट्रॅपमध्ये फसला आहे. असे कुठले शिक्षण आरएसएसमध्ये दिले तो देशद्रोही आहे सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

उल्हासनगरात एका कार्यक्रमानिमित्त नाना पटोले हे येणार असल्याची माहिती मिळताच कल्याण दुर्गाडी चौकात काँग्रेस नेते ब्रीज दत्त, दयानंद चोरगे, संतोष केने, जपजीत सिंग, शकील खान आणि कांचन कुलकर्णी यांनी मोठय़ा प्रमाणात कार्यकत्र्यासोबत पटोले यांचे जंगी स्वागत करीत सत्कार केला. यावेळी नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
द केरला स्टोरी या चित्रपटाच्या निर्मात्याने कोर्टात सांगितले की, ही काल्पनीक कथा आहे. हे वस्तूस्थिलाला आधारीत नाही. मात्र भाजपने वास्तविक दाखवून धार्मिक आणि सामाजिक वाद निर्माण करण्याचे काम भाजप करीत आहे. काश्मीर फाईल वेळीही भाजपने हेच काम केले. जनतेचे मूळ प्रश्नाला बगल देण्याचे काम करीत असल्याचे पटोले यांनी सांगितले.
सांगलीतील एका नीट परिक्षा केंद्रावर मुलींना कपडे उलटे करुन घालण्यास लावले या प्रश्नावर पटोले यांनी सांगितले की, महाराष्ट्रातल्या शिक्षण प्रणालीचे आणि सरकारचे यात जमीनआसमानचा फरक आहे. कोणीच कोणाचे ऐकत नाही. मुलींचे शाळेत परिक्षेच्या नावाने छेडखानी चालली आहे. या घाणोरडय़ा प्रकाराचा आम्ही निषेध करतो. सरकारने त्यात लक्ष घातले पाहिजे याकडे पटोले यांनी वेधले. सत्तासंघर्षाचा निकाल शेडय़ूल टेन प्रमाणो आला तर हे सरकार पडणार असा दावा पटोले यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *