कल्याण-शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार युवा खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि पूर्वेश सरनाईक यांनी युवा सेनेची कार्यकारीणी जाहिर केली आहे. युवा सेनेच्या सचिव पदी दीपेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.
म्हात्रे यांनी २००९ पासून कल्याण डाेंबिवली महापालिकेत नगरसेवक पदी काम केले आहे. त्याचबराेबर दाेन वेळा स्थायी समिती सभापदी पदाची धूरा सांभाळली आहे. शिंदे गटाच्या युवा सेना सचिव पदी म्हात्रे यांची निवड करण्यात आल्याने युवा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. म्हात्रे आजच्या घडीला मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या नियुक्तीनंतर युवा सेनेत आनंदाचे वातावरण आहे. युवा सेनेच्या सचिव पदाच्या निवडीनंतर म्हात्रे यांनी युवा सेना मजबूत करुन पक्षाकरीता संघटनात्मक आणि गुणात्मक काम केले जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.