कल्याण-आधी ३६ वर्षीय महिलेकडून २५ लाख रुपये घेतले. हे पैसे परत मिळणार आहेत असे सांगून महिलेला पुण्यात घेऊन गेला. हाॅटेलमध्ये रुम बूक करुन त्या रुममध्ये महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कल्याणच्या महात्मा फुले पाेलिसांनी अटक केली आहे. यासाेबत महिलेने ज्या व्यक्तिला ६० लाख रुपये दिले हाेते. त्यालाही पाेलिसांनी अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.
पिडीत महिलेकडून श्रीपाद ठाेसर या व्यक्तीने तीन वर्षापूर्वी ६० लाख रुपये घेतले हाेते. या ६० लाख रुपयांपैकी २५ लाख रुपये अनिल किल्लेदार याने घेतले. किल्लेदार हा बॅंकेतून सेवा निवृत्त कर्मचारी आहे. घेतलेले पैसे परत करीत नसल्याने पिडीत महिलेने पैशासाठी तगादा लावला. पिडीत महिलेला पैसे हवे असल्यास पुण्याला यावे लागेल असे किल्लेदार याने सांगितले. दिलेले पैसे पुण्यातून मिळणार आहे असे सांगून महिलेला किल्लेदार पुण्याला घेऊन गेला. त्याठीकाणी एका हाॅटेलमध्ये रुम बूक करुन तिच्यावर बलात्कार केला. पिडीत महिलेला पैसे मिळाले नाही. अखेरी महिलेने महात्मा फुले पाेलिस ठाणे गाठले. ठाेसर आणि किल्लेदार या दाेघांच्या विराेधात तक्रार दिली. या प्रकरणी पाेलिसांनी पिडीत महिलेची ६० लाखाची फसवणूक करुन ते पैसे परत करण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याच्या आराेपाखालीअनिल किल्लेदार याच्यावर गुन्हा दाखल केला तर महिलेची पैसे घेऊन परत न केल्याने फसवणूक प्रकरणी श्रीपाद ठाेसर या विराेधात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरिक्षक दीपक सराेदे करीत आहेत.