कल्याण
मालमत्ता कराची थकबाकी वसूल होण्याकरीता महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी आज अभय योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली
मात्र महापालिका हद्दीत अभय योजना लागू करा हे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिले होते अशी माहिती युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.
वाढीव मालमत्ता करापासून नागरीकांची मुक्तता व्हावी याकरीता मुख्यमंत्री शिंदे यंच्या दालनात नुकतीच एक बैठक पार पडली होती. यावेळी या बैठकीस युवा सेना सचिव म्हात्रे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत महापालिका हद्दीतील २७ गावांच्या वाढीव मालमत्ता कराचा विषय होता. नागरीकांची वाढीव करातून मुक्तता व्हावी. त्यांना दिलासा देण्यात यावा. याकरीता अभय योजना लागू करा अशी मागणी युवा सेना सचिव म्हात्रेयांनी मागणी केली होती. त्यांची ही मागणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनीआयुक्तांना आदेश दिले. आयुक्तांनी महापालिका हद्दीतील थकबाकी दाराकरीता अभय योजना लागू केल्याचे आज जाहिर केले आहे. १५ जून ते ३१ जुलै या कालावधीपर्यंत अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून २७ गावातील व क.डो.म.पा. क्षेत्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे .