Anc एक गटाच्या आराध्य देवीविषयी आक्षेपार्ह पोस्ट ला कमेंट करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करुन जमीनीवर नाक घासण्यास लावल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कायदा हातात घेत एका अल्पवयीन तरुणासोबत असे कृत्य केल्याबद्दल कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरीकाना आवाहन केले आहे की, कोणीही कोणाबद्दल आक्षेपार्ह विधान करु नये. अफवांवर विश्वास ठेवून नये.
काही दिवसापासून कल्याणमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात इंस्टाग्रामवर जोरदार वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने जो डिलिवरी बॉईचे काम करतो. त्याने एका समाजाच्या देवस्थानाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. दुसऱ्या गटाने या तरुणाचा शेाध घेतला. त्याला शोधून काढले. धक्कादायक म्हणजे या गटाच्या नेतृत्व एक तरुणी करत होती. तरुणाच्या पत्ता शोधून त्याला ज्या दुकानात तो काम करतो त्या ठिकाणी येऊन त आधी, मारहाण केली. त्याला अर्धनग्न करुन जमीनीवर नाक घासण्यास भाग पाडले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीनुसार त्याला मारहाण करणारे आणि जमीनीवर नाक घासण्यास भाग पाडणाऱ्यांचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नव्हे तर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या दुसऱ्या गटाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.