कल्याण ग्रामीण
कल्याण डोंबिवली महापालिकेने १५ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीकरीता अभय योजना लागू केली आहे .या पार्शवभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत केडीएमसीला इशारा दिलाय .आमदार राजू पाटील यांनी केलेल्या ट्विट मध्ये मुख्यमंत्र्यांनी २७ गावातील मालमत्ता करासंदर्भात एक समिती नेमून पुनर्मुल्यांकन करून तसेच पलावा मेगासिटीतील मालमत्तांच्या करामध्ये नियमाप्रमाणे ६६% सवलत देण्याचे मान्य केल्याप्रमाणे केडिएमसीने कर आकारणी करून बिल पाठवावीत,जेणे करून अभय योजनेचा फायदा नागरिकांना होईल व पालिकेचे थकित कर ही वसूल होईल . अन्यथा २७ गावं व पलावा परिसरातील नागरीक कर भरणा करणार नाहीत असा इशारा ट्विट करत दिलाय
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पलावा येथील २५ हजार फ्लॅटधारकांना आयटीपी प्रकल्पात समाविष्ट करत मालमत्ता करात सूट देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती .तसेच २७ गावातील वाढीव मालमत्ता कर कमी करण्यात यावा या मागणीसाठी देखील मनसे आमदार पाठपुरावा करत होते.कल्याण डोंबिवली महापालिकेने १५ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीकरीता अभय योजना लागू केली आहे .या योजनेअंतर्गत अभय योजना लागू झाल्यापासून दिलेल्या मुदतीत थकबाकीची रक्कम भरल्यास थकबाकीवर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रक्कमेपैकी ७५ टक्क व्याज माफ केले जाणार आहे. केवळ २५ टक्केच व्याजाची रक्कम भरावी लागणार आहे. या पार्शवभूमीवर मनसे आमदार राजू पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला ट्विट केलं आहे .या ट्विट च्या माध्यमातून आमदार पाटील यांनी १५ जून पासून संपूर्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत करावर आकारलेल्या दंडावर ७५% सुट जाहिर केली आहे.परंतु २ मे २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महापालिका क्षेत्रातील २७ गावांमधील जवळपास दहापट कर वाढलेला असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या २७ गावातील मालमत्ता करासंदर्भात एक समिती नेमून पुनर्मुल्यांकन करून तसेच पलावा मेगासिटीतील मालमत्तांच्या करामध्ये नियमाप्रमाणे ६६% सवलत देण्याचे मान्य केल्याप्रमाणे केडिएमसीने कर आकारणी करून बिल पाठवावीत, जेणेकरून आपण जाहीर केलेल्या ‘अभय योजना-२०२३’ योजनेचा सर्वांना फायदा घेता येईल व पालिकेचा थकीत करही वसूल होईल.परंतू तसे न झाल्यास २७ गावं व पलावा परिसरातील नागरीक कर भरणा करणार नाहीत असा इशारा दिला आहे .