बिघाड झालेला ट्रेलर दोन रिक्षावर धडकला ..रिक्षातील तीन प्रवासी जखमी
कल्याण : आज सकाळच्या सुमारास कल्याण पत्री पुलावर एका ट्रेलर मध्ये बिघाड झाला. बिघाड झालेला ट्रेलर विरुद्ध दिशेने येणार्या दोन रिक्षांवर धडकला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत :
आज सकाळच्या सुमारास एक ट्रेलर दुर्गाडी हून पत्री पूलच्या दिशेने येत होता.. यादरम्यान टेलर मध्ये पत्रिपुलाजवळ बिघाड झाला.. टेलर चालक यू टर्न घेत असताना त्याने समोरून येणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली. या धडकेत रिक्षातील तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांना ट्रेलर चालका विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय