कल्याण :- कल्याण पुर्वेतील १०० फ़ुटी रोडलगत असलेल्या आरक्षण क्र. २७९ वर वास्तव्यास असलेल्या नागरीकांना कल्याण सेशन कोर्टाने दिलासा दिला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे क्रिडासंकुलाचे आरक्षण असलेल्या भुखंडावरील बांधकामे म्हणुन घरे पाडुन घेण्याचे आदेश केलेल्या ३० रहीवाशांच्या घरांवर ह्यापुर्वी टागंती तलवार होती.
कल्याण पुर्वेतील १०० फ़ुटी रोडलगत मौजे-तिसंगाव येथील सर्व्हे नं. ५५ हिस्सा नं. ३ ह्या भुखंडावर कडोमपाने २०१२ मध्ये आरक्षण क्र. २७९ हे क्रिडासंकुलाचे आरक्षण टाकलेले होते. परंतु तेथे ह्यापुर्वीपासुनच नागरीकांची घरे वसलेली होती. २०१६ मध्ये कडोमपाने रहीवाशांना ह्यापुर्वी महाराष्ट्र महानगरपालिका प्रांतिक अधिनियमाच्या कलम २६० नुसार नोटीस पाठवुन बांधकामाच्या अधिकृततेबाबत पुरावे मागितलेले होते. नागरीकांनी पुरावे सादर केल्यानंतर कडोमपाने कोणतीही भुमिका घेतलेली नव्हती, त्यानंतर मार्च २०२३ मध्ये कडोमपाने पुन्हा २६० नुसार नोटीसी देऊन बांधकामाच्या अधिकृततेबाबत पुरावे मागितलेले होते, त्यानंतर कडोमपाने थेट ४८७ प्रमाणे बांधकामे बेकायदेशीर असल्याचा आदेश पारीत करत नागरीकांना ३० दिवसांत घरे पाडुन घेण्याबाबत आदेशित केलेले होते.
आपली घरे आरक्षित भुखंडावर आहेत, परंतु आपल्याला नळजोडणी, कर आकारणी तसेच वीज जोडणी व २०१२ पुर्वीचेच घरे खरेदीची कागदपत्रे होती. परंतु आपली घरे पाडुन टाकण्याच्या भितीने नागरीकांनी कोर्टात धाव घेतली होती. अड. गणेश घोलप ह्यांच्यामार्फ़ेत घरांना संरक्षण मिळणेकरीता जेसे-थे परिस्थिती ठेवण्याचा केलेला मनाई हुकुमाचा अर्ज कल्याण येथील दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) ह्यांनी फ़ेटाळुन लावलेला होता. स्टे न मिळाल्यामुळे सर्व रहीवाशी भयभीत झालेले असताना त्यांनी स्टे नाकारल्याच्या आदेशाविरोधात कल्याणच्या सेशन कोर्टात दाद मागितलेली होती. त्यावर जेसे-थे परिस्थिती ठेवण्याचा अर्ज निश्चित होईपर्यत जेसे-थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश कल्याणच्या सेशन कोर्टाने केलेला आहे. सेशन कोर्टाच्या आदेशामुळे १०० फ़ुटी रस्त्यावरील नागरीकांनी आयुष्याची पुंजी लावुन उभारलेली घरे वाचलेली आहेत.
नागरीकांची वाटाघाटीची भुमिका
स्टे मिळाल्यामुळे कडोमपाचे क्रिडासंकुल उभारण्याच्या प्रयत्नाना ब्रेक लागला असे अजिबात नाही. नेसर्गिक नाल्यामुळे भुखंड हा दोन हिश्यात विभागलेला आहे, त्यातील एक भुभाग अर्थात ९० टक्के भुखंड मोकळा आहे. तर उर्वरीत १० टक्के भुभाग हा करदात्या नागरीकांच्या घरांनी व्यापलेला आहे. तेथील आरक्षण रदद करुन आमची घरे कायम ठेवण्यात यावी, आमच्या विकासकार्यास कोणताःई विरोध नाही असे पत्र स्टे मिळवलेल्या ३० नागरीकांनी कडोमपाला देऊन सहकार्याची भुमिका दाखवलेली आहे. ही माहिती एडवोकेट गणेश घोलप यांनी दिली आहे