देवस्थानाबद्दल इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टला कमेंट करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण करुन त्याची अर्धनग्न धिंड काढल्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 5 आरोपींना यापूर्वी अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या तीन महिलांना अटक केली आहे. या तिन्ही महिलांची रवानगी कल्याण न्यायालयाने पोलिस कोठडीत केली आहे. या प्रकरणात अजून दहा ते बारा आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात तिन्ही महिलांना कल्याण न्यायालयात आज हजर करण्यात आले होते.
या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आठ आरोपी नाटक केली आहे तसेच चार अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेऊन पुढची प्रक्रिया केली आहे. आरोपीचे नावे 1,दर्शना बाळाराम पाटील, 2 शर्मीला प्रकाश लिंबरे, 3 डी. जी. जॉन डाेंगरे,4 निकीता रोशन कोळी, 5 समर्थ भुवना चेंडके, 6 अभिजीत दिपका काळे, 7 प्रथमेश राजारम डायरे, 8 साहिल महेश नाचणकर, 9 कुणाल शरद भोईर,10 नितीन दशरथ माने, 11 दीपक व्यंकट शिंदे, 12 विजय भिमा कदम, 13 सागर चितांमण निळजेकर, 14 विनय सुतार, 15 जय भोईर, 16 नितेश ढोणे अशी आहेत. यापैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे यापैकी तीन महिलांच्या समावेश आहे चार तरुण हे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधागृहात करण्यात आली आहे.
काही दिवसापासून कल्याणमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात इंस्टाग्रामवर जोरदार वाद सुरु होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने जो डिलिवरी बॉय काम करतो. त्याने एका समाजाच्या देवस्थानाविषयी आक्षेपार्ह विधानावर कमेंट केली होती. दुसऱ्या गटाने या तरुणाचा शेाध घेतला. त्याला शोधून काढले. त्याला शुक्रवारी मारहाण केली. त्याला अर्धनग्न करुन जमीनीवर नाक घासण्यास भाग पाडले. हा व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीनुसार त्याला मारहाण करणारे आणि जमीनीवर नाक घासण्यास भाग पाडणाऱ्यांचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नव्हे तर आक्षेपार्ह विधान आक्षेपारे पोस्ट टाकणाऱ्या दुसऱ्या गटाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.