विष्णूकर पोलिसांनी दोन भामट्यांना घेतले ताब्यात
Anchor : प्रवाशी बनून रिक्षात बसल्यानंतर प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुबाडणाऱ्या दोन जणांना विष्णू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात .सागर पारेख , संपतराज जैन अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व मोबाईल असा सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . या दोघांनी अनेक जणांना पेड्यात गुंगीची औषध टाकून लुटले असल्याची माहिती समोर आली आहे
व्हिओ : डोंबिवली पश्चिम गरीबाचा वाडा परिसरात राहणारे राकेश म्हामुणकर हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .राकेश डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा स्टँड वर रिक्षा घेवून रांगेत असताना दोन जण आले.त्यांनी बिर्ला मंदिर येथे जायचे असल्याचे सांगितले .राकेश यांनी दोघांना रिक्षात बसवले .बिर्ला मंदिर येथे दर्शन घेवून हे दोघे पुन्हा रिक्षात बसले व त्यांनी राकेश यांना गुंगीचे औषध टाकलेला पेढा प्रसाद असल्याचे सांगत खाण्यास दिला.पेढा खाल्ल्या नंतर राकेश बेशुध्द झाला .या दोन्ही प्रवाशी राकेशची सोन्याची चैन व मोबाईल घेवून पसार झाले .या प्रकरणी राकेश याने डोंबिवली विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती .या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या दोन भामट्याचा शोध सुरू केला .सीसीटिव्ही फुटेज व खबऱ्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींची ओळख पटवून या दोघांना विष्णू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात .सागर पारेख , संपतराज जैन अशी या दोघांची नावे आहेत.त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व मोबाईल असा मिळून सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला .या दोघांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसाना असून विष्णू नगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमोल आंधळे या प्रकरणाच्या पुढील तपास करत आहेत