प्रवाशाची बॅग व मोबाईल हिसकावून पळून जाणारा सराईत चोरटा गजाआड
कल्याण रेल्वे स्थानकावरील रेल्वे तिकीट काऊंटरवर तिकीटसाठी रांगेत उभ्या असणाऱ्या प्रवाशाची बॅग व मोबाईल हिसकावून पळणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे पोलीस व आरपीएफ च्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे .तोफिक शेख असे या चोरट्याचे नाव असून तोफिक हा सराईत चोरटा असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली .त्याच्याकडून चोरलेली बॅग व मोबाईल हस्तगत केला आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावरील रेल्वे तिकीट काऊंटर वर तिकिट घेण्यासाठी एक प्रवासी रांगेत उभा होता .याच दरम्यान एका चोरट्याने या प्रवाशाच्या हातातील बॅग व मोबाईल हिसकावून पळ काढला.प्रवाशांनी आरडा ओरड करताच प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असलेल्या कल्याण जीआरपी व आरपीएफ कर्मचाऱ्यांचे या घटनेकडे लक्ष गेलं. त्यांनी पाठलाग करत काही अंतरावरच या चोरट्याला पकडले. तोफिक शेख असे चोरट्याचं नाव असून सराईत गुन्हेगार असल्याची माहिती तपासात समोर आली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी तो शेख विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली .त्याने अशा प्रकारे किती गुन्हे केले त्याचा तपास पोलीस करत आहेत.