चार तासात १०० हून अधिक अवजड ,जड, छोट्या वाहनावर कारवाई ..एक लाख ९५ हजारांचा थकीत दंड वसूल.
कल्याण :वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंडात्मक चलान फाडून वाहतूक पोलिस कारवाई करतात .मात्र वाहनचालक हा दंड भरण्यास टाळाटाळ करत असून कोट्यवधी रुपयांची दंडाची थकबाकी आहे .. या थकीत ई चलान वसुलीसाठी कल्याण कोलशवाडी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवत अवघ्या चार तासात जड, अवजड व छोटी वाहने अशा १०० हून अधिक वाहनधारकांकडून एक लाख ९५ हजारांची दंड वसुली केली..
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाना वाहतूक पोलिसांकडून ई-चलन पाठवण्यात येते . मात्र बहुतांश वाहनचालक इ चलान द्वारे आकरण्यात येणारा दंड भरण्याची तसदी घेत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी वाहतूक पोलिसांचा कारवाईचा आकडा मोठा आहे .मात्र ई चलान केल्यानंतर वाहन चालक दंडच भरत नाहीत.
त्यामुळे दंडाची रक्कम वसूल होत नसून थकीत रकमेचा आकडा मोठा असल्याचं निदर्शनास आलं. या दंड चुकव्यांवर कारवाईसाठी वाहतूक पोलीस सरसावले आहेत .दंडाची थकबाकी वसूल करण्यासाठी कल्याण कोलशेवाडी वाहतूक शाखेच्या पथकाने आज सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत विशेष मोहीम राबवली .यादरम्यान जड, अवजड व छोटी वाहने अशा १०० हून अधिक वाहनधारकांकडून एक लाख ९५ हजारांची दंड वसुली केली..रोखीने ,क्यू आर कोड , तसेच ऑनलाइन पद्धतीने वसूल करण्यात आली ..कारवाई टाळण्यासाठी थकीत दंडधारकांनी जवळच्या वाहतूक शाखेत दंड भरावा ,अन्यथा ऑनलाइन दंड भरावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे