भाजप मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पाेलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने नंदू जोशीवर शारीरीक सुखासाठी धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात भाजप आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली आहे. सार्जजनिक बांधकाम मंत्री यांचे जोशी हे निकटवर्तीय मानले जातात.
डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात भाजप नेते आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात पोलिसांनी भादवी ३५४ अ,, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पिडीत महिला जी एका पोलिस अधिकाऱ््याची पत्नी आहे. तिचा आरोप आहे की नंदू जोशी यांनी तिला फ्ल’ट खाली करण्यासाठी आणि शारीरीक सुखाची वारंवार मागणी केली. अखेर तिने मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील माहिती अशी आहे की, पिडीत महिला एका पोलिस अधिकाऱ््याची पत्नी आहे. दोघांमध्ये वाद सुरु आहे. पोटगी रक्कम देण्यासाठी नंदू हे महिलेच्या घरी जात होते. त्याच दरम्यान त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे म्हणणे आहे की या प्रकरणा विरोधात भाजपकडून आंदोलन केले जाणार आहे.