डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे भाजपच्या जिल्हाध्यक्षकांनी या प्रकरणात गुरुवारी सकाळी ११ वाजता मोर्चाचे आयोजन केले आहे. तर या मोर्चात मनसे आणि शिवसेना सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे नंदू जोशी यांना अटक केली नाही तर राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड यांनी दिला आहे.
डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात भाजप नेते आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात पोलिसांनी भादवी ३५४ अ, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पिडीत महिला जी एका पोलिस अधिकाऱ््याची पत्नी आहे. तिचा आरोप आहे की नंदू जोशी यांनी तिला फ्ल’ट खाली करण्यासाठी आणि शारीरीक सुखाची वारंवार मागणी केली. अखेर तिने मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील माहिती अशी आहे की, पिडीत महिला एका पोलिस अधिकाऱ््याची पत्नी आहे. दोघांमध्ये वाद सुरु आहे. पोटगी रक्कम देण्यासाठी नंदू हे महिलेच्या घरी जात होते. त्याच दरम्यान त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी उद्या गुरुवारी सर्व पक्षीय मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या मोर्चात मनसे सहभागी होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिवसेनेकडून या माेर्चाबाबत काही एक सांगण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून या प्रकरणात आरोपीला अटक केली गेली नाही तर पक्षाकडून मोर्चा काढण्याचा इशारा दिल्याने या प्रकरणी राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.