डोंबिवलीतील मोठा गाव रेल्वे उड्डाण पूलाच्या कामाकरीता १६८ कोटीचा निधी मंजूर

Uncategorized

डोंबिवली ठाण्याला जोडणाऱ्या मोठागाव मानकोली खाडी पूलाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे .डोंबिवलीतील अतिशय महत्त्वाचा असलेला डोंबिवली मोठागाव रेल्वे लाईन वरील उड्डाणपुलासाठी लागणारा १६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या पुलाला लागणारा १६८ कोटी रुपये निधीतुन महानगरपालिकेला ३०% हिस्स्याचा भार उचलावा लागणार होता , परंतु महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने या संपूर्ण निधीची पूर्तता महाराष्ट्र शासनाने करावी अशी मागणी महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे व शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती .या मागणी नुसार या प्रकल्पाला लागणारा संपूर्ण निधी हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येईल अशी मंजूरी मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दीपेश म्हात्रे यांनी दिली. त्यामुळे लवकरच या कामला सुरूवाट मोठा गाव येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डोंबिवली ठाण्याला जोडणाऱ्या मोठा गाव ते माणकोली या खाडी पूलाचे काम अंतिम टप्प्यात असून जवळपास ८० टक्के काम मार्गी लागले आहे. लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे . मोठा गाव ते कल्याण दुर्गाडी हा रिंग रोड प्रकल्पाचा तिसरा टप्प्याचे काम सुरु केले जाणार आहे. मात्र रिंग रोड आणि मोठा गाव माणकोली खाडी पूलाकडे जाण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतून मोठा गावात जाण्यासाठी मोठा गाव येथे रेल्वे फाटक लागते. याठिकाणी रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या पूलाच्या कामाकरीतामहापालिकेच्या हिश्याची रक्कम ३० कोटी रुपये होती. तसेच पूलाच्या कामात बाधितांचे पुनर्वसन करण्याकरीता १३८ कोटी रुपयांची आवश्यकता होती. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ही रक्कम राज्य सरकारने उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. ही मागणी मान्य क्रंजयाली असून १६८ कोटीचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. हा निधी मंजूर झाल्याने मोठा गाव रेल्वे उड्डाणपूलाचे कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *