ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांचे गेल्या काही दिवसांपासून डायघर अंबरनाथ परिसरात भावि खासदार म्हणून बॅनर झळकलेत. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा डॉ श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात हे बॅनर झळकल्याने सर्वांचया भुवया उंचावल्या होत्या. याबाबत बोलताना शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी मिश्किल टीका केली.कार्यकर्ते उत्साही असतात आजकाल कुणाला पद मिळालं की तो भावी नगरसेवक होतो ,भावी आमदार होतो ,भावी खासदार होतो भावी मुख्यमंत्री होतो ,भावी पंतप्रधान होतो ,सुभाष भोईर यांनी भावी खासदार होण्यापेक्षा त्यांनी थेट पंतप्रधान पदाची निवडणूक लढवावी त्याला आमच्या शुभेच्छा आम्ही पण जाऊ त्यांच्या प्रचाराला अशा शब्दात माजी आमदार सुभाष भोईर यांची खिल्ली उडवली .
संजय राऊत सत्ता गेल्यामुळे बावचळलाय.. त्याच्यासाठी आम्ही ठाणे हॉस्पिटल मध्ये बेड तयार ठेवलाय – आमदार विश्वनाथ भोईर यांची सडेतोड टीका
संजय राऊत सत्ता गेल्यामुळे बावचळलाय …सत्ता गेल्यामुळे त्याची अवस्था अशी झाली आहे त्यामुळे आता तो थुंकेल काय आणि काही दिवसांनी आणखी काही वेडेचाळे करेल …संजय राऊत यांना पुढे मागे त्रास होवू नये म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगून ठाणे येथील हॉस्पिटल मध्ये एक बेड कायमस्वरूपी बुक करून ठेवतो अशी टीका आमदार विश्वनाथ भोईर यांनी संजय राऊत यांच्यावर केली .संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर सातत्याने टीका करत आहेत .या टीकेला आमदार विश्वनाथ भोईर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय .