मनसे आमदार राजू पाटील यांचे शिवसेना नेते दीपेश म्हात्रे यांना सडेतोड उत्तर
कल्याण
माझ्या बापदादांनी पाकिटमारी करुन किंवा कंत्राटदाराकडून टक्केवारी घेऊन पैसे कमाविले नाही.आम्ही चार भाऊ आहोत. आमच्या वडिलांच्या नावाने वारकरी भवन लवकर उभे करु ज्या वारकरी भवनासंदर्भात बोलले जात आहे. त्याच्यासाठी बिल्डरकडून बदली जागा घेतली होती. त्याच नीच राजकारण स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केले गेले. ज्या बिल्डरकडून बदली जागा घेणार होतो.
बिल्डरला धमकाविले गेले. बिल्डरला सांगितले गेले की, तुझा ७०० एकरचा प्लान पास होऊ देणार नाही. त्या बिल्डराने मला विनंती केली त्या जागेवर करु नको. नंतर मी दुसरी जागा शोधली आहे असे प्रतिउत्तर मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना नेते दीपेश म्हात्रे यांना दिले आहे . म्हात्रे यांनी राजू पाटील यांच्यावर त्यांच्याकडून स्वखर्चातून वारकरी भवन बांधण्याच्या घोषणेवर टिका केली होती.
कल्याण ग्रामीण मधील अनेक भागात पाणी टंचाई आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी रविवारी अनंतम रिजेन्शी येथेे जाऊन नागरीकांची भेट घेतली. त्याठिकाणी पाणी समस्या काय आहे हे जाणून घेतले. त्यानंतर सोमवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. राजू पाटील यांनी सांगितले की, एकंदरीत केडीएमसीतील २७ गावात पाणी टंचाई आहे. अमृत योजनेचे काम संथ गतीने सुरु आहे. मंजूर पाण्याचा कोटा मिळत नाही. पाण्याचा कोटा वाढविल्याशिवाय पाणी समस्या सुटणार नाही. तात्पुरता दिलासा देण्यासाठी काय करता येईल. यासंदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांना उपाययोजना सांगितल्या. अमृत योजनेचा १०५ एमएलडीचा कोटा द्या. केडीएमसीचे १४० दश लक्ष लीटरचे पाणी कोटा नवी मुंबईला जातो. ताो परत द्या. त्याचे आश्वासनही दिले गेले.देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन ही दिले होेते. तो कोटा अद्याप आम्हाला मिळालेला नाही. तो कोट्यासाठी भांडलो तर या ठिकाणचा पाणी प्रश्न सूटणार आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेते दीपेश म्हात्रे यांनी केलेला टीकेवर प्रतिक्रिया दिली.
यावेळी मनसेचे शहर प्रमुख मनोज घरत, योगेश पाटील हे उपस्थित होते.