मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्यात ज्या जलवाहिनीच्या कामाचे लोकार्पण होणार आहे. ती जलवाहिनी लिकेज झाल्याने तिच्या दुरुस्तीचे काम कार्यक्रमाच्या पूर्वीच हाती घेण्यात आहे. यावरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी टिका करणारे ट्वीट केले आहे. आज मुख्यमंत्री दिव्यातील रस्ते आणि पाणी विकास कामाचे लोकार्पण करण्यास येणार आहेत. हे समजताच दिव्यातील रस्त्याला पाझर फुटला. दिवेकरांनो काळजी नसावी काम चालू आहे. वर्षानुवर्ष.
तर दुसरीकडे दिवा भाजप अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी भ्रष्टाचाराची जलवाहिनी फुटली अशी टिका शिवसेनेवर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्या हस्ते आज दिव्यातील विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण होणार आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे. या कार्यक्रमाच्या आधीच राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावले. त्या बॅनर वर उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा फोटो लावला नाही. मनसे आमदार राजू पाटील यांनी कार्यक्रमाचे चार तास आधी निमंत्रण देण्यात आले. हे सगळे सुरु असताना ज्या जलवाहिनचे भूमीपूजन मुखयमंत्री करणार आहेत. ती जलवाहिनी लिकेज झाली. जलवाहिनी लिकेज झाल्याने रस्त्यावर पाणी वाहू लागले. प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या मुद्यावरुन भाजप आणि मनसे आक्रमक झाले आहे. मनसे आमदार पाटील यांनी ट्वीट करीत शिवसेनेला लक्ष्य केले आहे. या ट्वीट मध्ये त्यांनी जलवाहिनी लिकेज झाल्याचे फोटो टाकून टिका केली.
या प्रकरणावर भाजप दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सांगितले दिवा विभागात विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री येणार आहे. त्या आधीच भ्रष्टाचाराची जलवाहिनी फुटली असल्याची टिका केली आहे.