घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ यासंदर्भात तक्रारी घेऊन महापालिका मुख्यालयात आले. शहर अभियंता यांच्या कार्यालयात चर्चा सुरु असताना शहर अभियंता अर्जून अहिरे यांनी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष सलीम शेख यांना सुरक्षा रक्षक बोलावून कार्यालयाबाहेर काढल्याने काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये संतापाची लाट पसरली आहे. आयुक्तांनी शहर अभियंता अहिरे यांच्या विरोधात ठोस कारवाई केली पाहीजे. अन्यथा काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कल्याण पश्चिमेतील मोलवी कंपाऊंड परिसरत गटारे चोक अप झाल्याने पाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे रहदारीला समस्या निर्माण झाला आहे. आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नवी गोविंद वाडी बासपासला मोठी गटारे आहेत. त्याची स्वच्छता केली गेली नाही. त्यामुळे परिसरात नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वात स्थानिक रहिवासीयांचा माेर्चा महापालिकेत आला. मोर्चाचे एक शिष्टमंडळातील समाजसेविका शिफा पावले आणि अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शेख यांच्या नेतृ्त्ाखाली शहर अभियंता अहिरे यांना भेटीस गेला. लोकांकडून सांगितले गेले की, केडीएमसीकडून काय उपाययोजना केली पाहिजे. ही चर्चा सुरु असताना सलीम शेख दालनाबाहेर होते. ते दालनात गेले. समस्या बाबत चर्चा सुरु केली. या दरम्यान शहर अभियंता अहिरे हे संतापले एक गोष्ट किती वेळा बालता असे सांगून सलिम शेख यांना सुरक्षा रक्षकांच्या करवी बाहेर काढले. असा सलिम शेख यांचा आरोप आहे. याबाबत केडीएमसीचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्याशी या प्रकरणावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही