तुकोबांचा अभंग म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे आमदारांवर अप्रत्यक्ष टीका

Uncategorized

दिव्यातील बेतावडे गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आगरी कोळी वारकरी भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी भाषण दरम्यान कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर तुकारामांचा अभंग वाचून टीका केली . एवढा मोठा चांगला कार्यक्रम होत असताना काही लोकं टीका करतात , आजचा एव्हढा चांगला दिवस त्यामध्ये देखील लोकांना दुर्बुद्धी सुचते , खासदार श्रीकांत शिंदे यांनी तुकारामांचा एक अभंग वाचून मनसे आमदारांवर टीका केली. वारकरी भवन वरून मनसे आणि शिवसेनेत चांगली जुंपली आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना नेत्यांवर नाव न घेता टीका केली होती या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका प्रकारे प्रत्युत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *