दूषित पाण्याने त्रस्त शिवसेना नेत्याचे अधिकारी दालनाबाहेर ठिय्या आंदोलनसत्ता असूनही समस्या सूटत नसल्याची शोकांतिकामुख्यमंत्री खासदारांकडे करणार तक्रार

Uncategorized

तीन प्रभागात पाण्याची समस्या सूटत नाही. जे पाणी येते दूषित येतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काही केले जात नाही. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांनी महापालिका अधिकाऱ्याचा दालनाबाहेच ठिय्या मांडला. काही काळ अधिकाऱ्याला दालनात जाण्यास मज्जाव केला. आपली सत्ता असताना आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला आंदोलन करावे लागते. ही शोकांतिका आहे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे शिंदे यांना भेटून सांगणार असल्याचे उगले यानी सांगितले आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे यांनी सांगितले की, त्याठिकाणचा वॉल नादुरुस्त झाला होता. तो तातडीने दुरुस्त केला जाणार आहे. पाण्याची समस्या नाही.

कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, ठाणकर पाडा, बेतूरकरपाडा या परिसरात गेल्या अनेेक महिन्यापासून पाणी समस्या आहे. जे पाणी येते ते दूषित आहे. अनेक महिन्यापासून माजी नगरसेवक उगले आणि पदाधिकारी याच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. परंतू ही समस्या सूटत नाही. शुक्रवारी सकाळी मोहन उगले महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे यांना भेटण्यासाठी आले. मोरे यांच्या दालनात कुलूप होते. त्या दालनाबाहेच उगले यांनी ठिय्या मांडला. काही वेळेत मोरे हे कार्यालयात आले असता त्यांना उगले यांनी कार्यालयात जाण्यापासून मज्जाव केला. या बाबत उगले यांचे म्हणणे आहे. काही भागात गेल्या दोन वर्षापासून ३ प्रभागात पाणी समस्या भेडसावत आहे. वारंवार आमदार विश्वनाथ भाेईर आणि शहर प्रमुख रवी पाटील यांना कल्पना दिली आहे. या भागातील जलवाहिन्यातून कमी दाबाने पाणी येते. जलवाहिन्या या ड्रेनज लाऊनमधून गेल्याने दूषित पाणी येते. आयुक्तांना याबाबत चार वेळा भेटलो आहे. गेल्या पाच दिवसापासून नागरीकांना पाणी नाही. टँकर मागायला गेलो तर टँकरचे पैसे मागतात. नियमीत पाणी बिल भरणाऱ्यांना टँकरचे पैसे मागतिले जातात. ही शोकांतिका आहे. आत्ता पाण्याबाबत रात्री दहा पर्यंत सुधारणा करण्याचे आश्वासन अधिकारी वर्गाने दिले आहे. तरी देखील समस्या सूटणार नसेल तर मुख्यमंत्री आणि खासदार यांना भेटणार असल्याचे उगले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *