विना नंबर प्लेट ची गाडी थांबवून कागदपत्रांची विचारणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दुचाकीस्वाराने शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्व फडके रोड परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली .संतोष कांबळे असे मारहाण करणार्या आरोपीचे नाव असून डोंबिवली राम नगर पोलिसांनी संतोष विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
डोंबिवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवलदार रवींद्र कर्पे काल रात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील फडके रोड वर सहाकाऱ्यासह गस्त घालत होते.याच दरम्यान त्यांना नंबर प्लेट नसणारी दुचाकी भरधाव वेगाने येताना दिसली . कर्पे यांना संशय आल्याने त्यांनी दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र दुचाकीस्वार भरधाव वेगाने दूचाकी घेऊन गणपती मंदिराच्या दिशेने पळून गेला. मात्र कर्पे यांना ही दुचाकी चोरीची असल्याचा संशया आला .त्यांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग करत काही अंतरावर त्याला थांबवले व त्याच्याकडे कागदपत्राचे विचारणा केली. त्यामुळे संतापलेल्या दुचाकीस्वाराने कर्पे यांच्याशी हुज्जत घातली .त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली व तेथून पळून गेला .या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी अवघ्या तासाभरात या मारहाण करणार्या संतोष कांबळे या दुचाकी स्वाराला अटक केली .संतोष कांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.