विकास आराखड्यातील रस्ता होता केडीएमसीच्या नजरेत दुर्लक्षीत
आमदार राजू पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्याने रस्ता नागरिकांच्या सेवेत
केडीएमसीच्या विकास आराखड्यात असलेला आयरे येथील बालाजी गार्डन संकुलात जाणारा रस्ता अनधिकृत बांधामुळे रखडला होता. प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी या संदर्भात पाठपुरावा करून रस्त्याचे काम पूर्ण केलं आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी आपल्या आमदार आणि राज्य सभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या खासदार निधी मधून रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे
विकास आराखड्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये अनधिकृत बांधकाम येत होते. या बांधकामामुळे रस्ता तयार करण्यात अडथळा येत होता. या कामासाठी केडीएमसीने अक्षम्य दुर्लक्ष होत होते,वर्षानुवर्ष तेच तेच वकिल महापालिकेच्या पॅनलवर आहेत परंतु कोर्टाकडून आदेश आणण्यासाठी कासवगतीने प्रयत्न चालू होते. याच काळात स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांनी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांच्या कडून २० लाखाचा खासदार निधी मिळवला होता. परंतु केडीएमसीच्या गलथान कारभारामुळे तो निधी सुद्धा परत जाण्याच्या मार्गावर असल्याचे तसेच मंजूर निधीतून सदर रस्ता पुर्ण होणार नसल्याचे तिथे राहत असलेल्या मनसेच्या महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा दिपिका पेडणेकर यांनी हि बाब आमदार राजू पाटील यांच्या निदर्शनासन आणून दिली होती. त्यानंतर तात्काळ मनसे आमदार राजू पाटील यांनी २५ लाख आमदार निधी दिला व पालिकेत पाठपुरावा करून अनधिकृत बांधकाम कोर्टातून आदेश आणून निष्कासीत करून अखेर हा रस्ता पुर्ण झाला आहे. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या बालाजी गार्डन मधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या कामासाठी बालाजी गार्डनचे रहिवासी श्री.चौधरी यांनी वेळेवेळी केलेला पाठपुरावा व कागदपत्र उपयोगी आली आहेत. मात्र केडीएमसीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची केडीएमसीकडून दखल देखील घेतली जात नव्हती. मायंत्र मनसे आमदार राजू पाटील यांनी हे काम हाती घेत पूर्णत्वास नेले आहे. त्यामुळे बालाजी गार्डन मधील नागरिकांनी मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले आहे.